“
Love decides what is wrong, instead of who is wrong.
~ वपु काळे [VP Kale]
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात, ती नेहमी समाधानातच असतात.
”
”
V.P. Kale (पाणपोई [Panpoi])
“
शृंगार आणि वैराग्य एकत्र नांदत नाहीत, त्याचप्रमाणे संशय आणि भक्ती . वैराग्य केवळ तारुण्यावर आघात करीत असेल, पण संशय उभ्या आयुष्याची राख करतो.
”
”
V.P. Kale (वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995 (Marathi Edition))
“
पात्रता नसताना ह्या देशात फक्त एकच गोष्ट मिळते. ती म्हणजे मंत्रिपद, सत्ता.
”
”
V.P. Kale (पाणपोई [Panpoi])
“
स्वाभाविक गोष्टींवर चिडण्यात अर्थच नसतो. भुंगे जमावेत म्हणून कमळ फुलत नाही, आणि एखादं कमळ पकडायचं असं ठरवून भुंगे भ्रमण करीत नाहीत. फुलणं हा कमळाचा धर्म, भुलणं हा भुंग्याचा धर्म. जाणकारांनी, रसिकांनी कमळाकडे पाहावं, भुंग्याकडे पाहावं आणि फुलावं कसं आणि भुलावं कसं हे शिकावं.
”
”
V.P. Kale (वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995 (Marathi Edition))
“
माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही. एकटा राह्यला की हरवतो.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील. आनंद वेगळे आहेत; पण दु:ख एकच आहे याचं त्यांना समाधान वाटलं.
”
”
V.P. Kale (गुलमोहर [Gulmohar])
“
प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.
”
”
V.P. Kale (गुलमोहर [Gulmohar])
“
माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते.
”
”
V.P. Kale (Ka Re Bhulalasi (Marathi))
“
सरकार कोसळलं की नवं राज्य स्थापन होईतो पहिल्या सरकारचीच ‘काळजीवाहू सरकार’ म्हणून नेमणूक करायची, हाच प्रचंड विनोद. सत्तेवर असताना ज्यांना काळजी घेता आली नाही, ते सत्ता गेल्यावर कोणती काळजी वाहणार? कदाचित
”
”
V.P. Kale (पाणपोई [Panpoi])
“
शरीर हे एकच साम्राज्य असं आहे, आणि इतकं महाकाय आहे की त्याला एक राजधानी पुरत नाही. आवेग आणि विवेक ह्या दोन राजधान्यांचा इथे अंमल चालतो. एकमेकांचं अस्तित्व आणि महत्त्व दोघी जाणतात, एकमेकींचं एकमेंकींवर अतिक्रमणही होतं. त्या वेळी संपूर्ण साम्राज्य जिचं प्राबल्य जास्त तिच्या स्वाधीन केलं जातं. राज्याचं होणारं नुकसान नंतर दोघीही भरून काढतात. अधिकार आणि अंमल ह्यात ज्या राजधानीची सरशी होईल त्या प्रमाणात साम्राज्याचा डोलारा टिकतो किंवा कोसळतो. विवेक ह्या मुख्यमंत्र्याचे पाच सल्लागार. दूरदृष्टी, निश्चय, संयम, एकाग्रता आणि सातत्य. आवेगाचं राज्य अनेकांच्या हातात. एका राजधानीत काहीशी हुकूमशाही तर दुसरीत संपूर्ण लोकशाही. षड्रिपूंच्या मंत्रिमंडळाबरोबरच प्रलोभनं, जाहिरात, प्रसिद्धी, अपेयपान, भ्रष्टाचार ह्या सगळ्यांचं थैमान आहे. दोन्ही राजधान्यांतले मंत्री एकमेकांच्या राज्यात इथेही दौरे काढतात, शिष्टमंडळं पाठवतात, पण ते स्वतःच्या स्वार्थासाठी नसून साम्राज्य टिकावं म्हणून. इथे साम्राज्यापेक्षा दोन्ही राजधानींत स्वतःचं पद मोठं मानलं जात नाही.
”
”
V.P. Kale (वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995 (Marathi Edition))
“
अापल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हाच नरक !
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
सर्व हळुवार, कोमल भावना गुंडाळून ठेवून निर्लज्ज कोडगेपणाने फक्त स्वार्थच पाहायचा ठरविला तर मग विश्वास, प्रेम, स्नेह सर्व कल्पनाच बाद ठरतात. कसलाही विधिनिषेध बाळगायचा नाही असं एकदा ठरवलं की मग वाईट तरी कशाचं वाटणार आहे?
”
”
V.P. Kale (दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel])
“
ज्योतीची शक्ती समजण्यासाठी अंधारच व्हावा लागतो!
”
”
V.P. Kale (Dost (Marathi))
“
आज पन्नास वर्षं झाली तरी भारताचं भवितव्य अंधारात आहे. जग जिंकायची गोष्टच सोडा; दोन बाय दोन किंवा आणखी प्रशस्त असेल ती दिल्लीची खुर्ची मिळवताना मारामाऱ्या चालल्या आहेत. डायोझेनससारखा निःसंग नेता कधीतरी लाभेल का? मार्क
”
”
V.P. Kale (पाणपोई [Panpoi])
“
सकाळच्या काहीशा शांत वातावरणात तो आवाज फार कर्कश वाटला. क्षणभर दचकायलाही झालं.
”
”
V.P. Kale (Ghar Haravleli Manasa (Marathi))
“
अंधारात वीज चमकली की वाट उजळून निघते; पण नंतरचा अंधार जास्त गडद होतो. नजर तोपर्यंत अंधाराला सरावलेली असते. प्रकाशाचा क्षण अपरिचित असतो. मनाची पूर्वतयारी नसताना विजेचा लोळ येतो आणि जातो.
”
”
V.P. Kale (Aapan Sare Arjun (Marathi))
“
लग्न-विवाह हा एकच विषय खूप मोठा आहे. आजही देशस्थ, कोकणस्थ, कर्हाडे, सी.के.पी., एस.के.पी. हे भेदभाव नाहीत का? समोरची व्यक्ती आपल्यासारखीच जिवंत आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो? सौंदर्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतील, हे मी समजू शकतो. गरिबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजून मध्ये येतात. परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टींभोवती आजही आपण वावरत आहोत? कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं?
”
”
V.P. Kale (Aapan Sare Arjun (Marathi))
“
तुला झोपायची व्यवस्था दुसरीकडे करावी लागेल. अापल्या अख्ख्या चाळीत फक्त फणशांच्या घरात माणसं कमी अाहेत. अाई त्यांच्याकडे झोपेल. तू तुझी सोय बघ.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
प्रत्येक माणूस म्हणजे एक कोडं आणि एक माणूस एकदाच, हे आणखी एक कोडं.
”
”
V.P. Kale (Aapan Sare Arjun (Marathi))
“
नाविन्याइतकी चटकन् शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तू नसेल.
”
”
V.P. Kale (तप्तपदी [Taptapadi])
“
अगर अौर जीते रहते तो यही इंतजार होता.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])
“
Everyone is bearing the brunt of the changing times. We may console ourselves by saying that there’s variety in the way we get pushed to the limit each time. We hold on to our egos as we strain under it. Egos that console us by saying that no one else could have borne the stress. That anyone else would have buckled. We get a strange kind of satisfaction when we see others suffer more than us. We are like the proverbial Arab in the story. The camels may keep changing.
”
”
V.P. Kale (Karmachari: Short Stories About Ordinary People)
“
का वं? असं कशापायी? चांगलं बेस झाड हाय की. बांधकामात येतं की काय? अरारा, लई वंगाळ. मला वाटलं, बाभूळ वगैरं असेल. झाड वाचवा साहेब, चांगलं हाय.’’ ‘‘तू काम कर. मला शिकवू नकोस. मला हे झाड नको म्हणजे नको.’’ लाकूडतोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुऱ्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकरपंतांच्या आख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाखा हाणला. दुसऱ्या घावासरशी त्यांचा भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकरपंतांना प्लॉटचा वर्षवाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाऱ्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकरपंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. वेचता वेचता त्यांना उगीचच भास्कर आठवला. त्यांना वाटलं, आपण फुलं गोळा करीत असताना तो पटकन म्हणेल, ‘‘चक्कर आहे दिवाकरपंत.’’ घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती, दिवाकरपंतांचं स्वप्नही लहान लहान होत होतं. रस्त्यावरून जाणारे येणारे म्हणत होते, ‘‘आम्ही असतो तर झाड बचावून बंगल्याचा प्लॅन केला असता.’’ –घावाघावागणिक दिवाकरपंत तांबड्या फुलांच्या सड्यात भिजत होते.
”
”
V.P. Kale (Gulmohar (Marathi))
“
एकदा एका लाकूडतोड्याची बायको विहिरीत पडली. त्याला पोहता येत नव्हतं, पण त्याच वेळेला त्याला एक अशीच जुनी घटना आठवली. त्यानं विहिरीच्या काठावर बसून परमेश्वराचा धावा सुरू केला. हा धावा अंत:करणापासून आहे, हे त्या दयाघनाने जाणलं. ज्ञानेश्वरीच्या भांडवलावर प्रवचनांचा धंदा करणाऱ्या पंडित-पुरोहितांची ती हाक नव्हती. तो धावून आला. त्याने विहिरीत उडी मारली. परकीयांच्या भांडवलावर चालणाऱ्या चित्रपटसृष्टीतल्या माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या एका देखण्या बाईला घेऊन तो काठावर आला. अस्सल मोत्यांच्या दागिन्यांनी ती लगडलेली होती. लाकूडतोड्या नम्रपणे म्हणाला, ‘‘भगवंता, ही माझी पत्नी नाही.’’ परमेश्वराने पुन्हा बुडी मारली आणि तो काठावर आला. ह्या वेळेला तर डिम्पलला मागे सारील अशी युवती. सुवर्णालंकारांच्या भाराने वाकलेली. पुन्हा हात जोडीत लाकूडतोड्या म्हणाला, ‘‘का भक्ताची मस्करी करता?’’ परमेश्वराने तिसऱ्यांदा सूर मारला. ह्या वेळेला काजोलसारखी यौवना आणि अंगावर नजर दिपून जाईल असे हिऱ्याचे अलंकार. लाकूडतोड्या पुन्हा काकुळतीला आला. मग भगवंताला त्याच्या निर्लोभी मनाची करुणा आली आणि लाकूडतोड्याच्या खऱ्याखुऱ्या अर्धांगीसह तो वर आला. पहिल्या तिघी विहिरीच्या काठावरच बसल्या होत्या. लाकूडतोड्याने स्वत:च्या पत्नीकडे पाहिलं आणि तो म्हणाला, ‘‘भगवंता, तुम्हाला खूप कष्ट दिले; पण हीसुद्धा माझी पत्नी नाही.’’ जगदीश्वराला धक्काच बसला. ‘‘असं कसं म्हणतोस? मीच तुमची जन्मगाठ घालून दिली होती.’’ ‘‘होय दयाघना. तरी मी हिचा स्वीकार करीत नाही, कारण...’’ ‘‘बोल!’’ ‘‘मागे एकदा आपण अशीच एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड विहिरीतून काढून दिली होतीत. ते माझे पणजोबा. त्यांना तुम्ही सद्वर्तनाबद्दल तिन्ही कुऱ्हाडी बक्षीस दिल्यात. तसं पुन्हा केलंत तर? एका पत्नीचं पोट भरताना नाकात दम आलाय. आता जंगलतोड थांबवायची, असं वर्षानुवर्षं म्हणताहेत. पण हॉटेल्स बांधणारे बिल्डर्स सुटतात. वनरक्षक वनभक्षक झालेत. मी नेमका सापडलो तर चार बायकांना कसं सांभाळू?’’ ‘‘अरे वेड्या भाबड्या, त्या तिघींच्या अंगावरचे दागिने पाहिलेस तर तुला दोन पिढ्यांचा प्रश्न सोडवता येईल.’’ लाकूडतोड्या लगेच म्हणाला, ‘‘माझ्या पणजोबांच्या काळात इन्कमटॅक्सवाले नसावेत. कायद्याचं राज्य होतं. तुम्हीही गुप्त व्हा. तुमच्याजवळ रत्नजडित मुकुटापासून सगळं आहे.
”
”
V.P. Kale (पाणपोई [Panpoi])
“
कितीही उच्च पद मिळालं तरीही ते पोरकंच असतं. ‘पद’ लाभताक्षणी ‘पदर’ भेटावा लागतो. पदाबरोबरच जेव्हा पदर लाभतो, तेव्हाच लोखंडाचं सोन्यात रूपांतर करायची ताकद परिसाजवळ येते.
”
”
V.P. Kale (पाणपोई [Panpoi])
“
व्यवहारी माणसांत, समाजात चांगलं वागायचं ते केवळ वाईट दिसू नये म्हणून. म्हणजेच मूळ वृत्तीला विसरून रीत सांभाळायची. इथंच यातना आहेत. एखादाच बदल असा असतो की त्याचा मनानं स्वीकार केला जातो. बाकी सगळं लादलेलं असतं. प्रत्येक माणूस आयुष्यभर इतरांवर काही ना काही लादत असतो. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला स्वतःसारखं करण्याची धडपड करतो. जितक्या प्रमाणात समोरचा माणूस आपल्या मनाप्रमाणे वागेल तेवढ्याच प्रमाणात तो समोरच्या माणसावर प्रेम करतो. ह्या स्वरूपाचं प्रेम करणं हे प्रेमच नाही. ही स्वतःचीच पूजा झाली. समोरचा माणूस जसा असेल तसे स्वीकारणारे किती?
”
”
V.P. Kale (वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995 (Marathi Edition))
“
आपल्या आवडीप्रमाणे सत्य बदलत नाही, बेटा. सत्यावरच आपली आवड बेताची असते. मी म्हणतो ते खरं आहे. संसार हा एक व्यवहार आहे, तडजोड आहे आणि तडजोड करणं हा माणसाचा स्वभाव झाला.
”
”
V.P. Kale (Ka Re Bhulalasi (Marathi))
“
एखाद्या घटनेतला ‘मी’ काढून टाकला तर समस्येवर उपाय हमखास मिळतो. कारण त्या परिस्थितीतलं ममत्व नाहीसं होतं.
”
”
V.P. Kale (Ka Re Bhulalasi (Marathi))
“
As you write more and more personal, it becomes more and more universal.
”
”
V.P. Kale (पार्टनर [Partner])