“
दुसऱ्यातला चांगुलपणा स्वीकारला नाही, की ती असूया बनते आणि दुसऱ्यातल्या चांगल्या गुणांची कदर केली, तर ती प्रेरणा बनते. कोणत्याही व्यक्तीला जर आपण कोणत्याही अटीशिवाय स्वीकारलं, तर ते प्रेम बनतं आणि जर अटी, शर्ती घातल्या, की त्या व्यक्तीबाबत द्वेष तयार होतो. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही, त्या गोष्टींबद्दल त्रागा केला; तर संताप निर्माण होतो व त्याच गोष्टी बदलू शकतो की बदलू शकत नाही, हे शहाणपण आलं, की सहिष्णुता तयार होते.
”
”